सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्हास्तरीय शालेय क्रिडा स्पर्धेत श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीच्या हिंदवी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. बॉक्सिंग आणि आर्चरी या दोन क्रिडा प्रकारात चार खेळाडूंनी यश मिळवून त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यानंतर झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत दोन पदकांची कमाई केली.
हिंदवी स्कूलमध्ये इयत्ता 9 वीतील विद्यार्थी तन्मय कडव व 8 वीतील विद्यार्थी राज शिंदे यांनी सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत गोल्ड मिळवले. त्यांची महाड (रायगड) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर इयत्ता १० वीतील विद्यार्थी साहिल शेलार व सहावीतील शरण्या कदम हिने गोल्ड पदक जिंकले. त्यांची बुलढाणा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
महाड येथे झालेल्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत तन्मय राहुल काडव याने सिल्वर व बुलडाणा येथे झालेल्या राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेत साहिल शेलार याला कास्य पदक मिळाले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल हिंदवी स्कूलचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, सचिव नानासाहेब कुलकर्णी व सर्व शिक्षकांनी त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक विनोद दाभाडे, संदीप कदम व गौरव माने यांचे मार्गदर्शन लाभले.
You must be logged in to post a comment.