सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : राज्यात करोनाच्या ओमिक्रोन वेरीयंटचा शिरकाव झाल्यानंतर मास्क वापरणे बंधनकारक ठरवण्यात आले. तरीही अनेक सातारकर मास्क न वापरता घराबाहेर पडत होते. तेव्हा पालिकेने संसर्ग रोखण्यासाठी मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे.
सातारा नगरपरिषद, सातारा व शाहुपुरी पोलीस स्टेशन यांचे संयुक्त पथकाने मा. जिल्हाधिकारीसो यांनी दिलेल्या आदेशानुसार सातारा शहरातील बाजारपेठेमध्ये विनामास्क, सोशल डिस्टंसींगचे पालन न करणा-या चंद्रविलास भुवन, लाटकर पेढे वाले, सिटी सेंटर, देवी अँड सनस या दुकानांवर कारवाई करुन सुमारे 4000/- दंड वसुल करण्यात आला आहे. तसेच सातारा नगरपरिषदेच्या वाहनादवारे व्यावसायिक तसेच इतर दुकानदार यांना त्यांचे आस्थापनांमध्ये मास्क घालणे, सोशल डिस्टंसींग पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणेबाबत लाउडस्पिकरदवारे सुचना देण्यात आल्या आहेत. कारवाई पथकामध्ये सातारा नगरपरिषदेचे अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले, शाहुपुरी पो.स्टे.चे अजित जगदाळे, नगरपरिषदेचे प्रणव पवार व अतिक्रमण पथकाचे प्रशांत निकम उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.