खंडाळा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : खंडाळा तालुक्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या सहकारातील साखर कारखान्याची निवडणूक अतिशय चुरशीने झाली . बाळसिध्दनाथ संस्थापक पॅनल व शेतकरी विकास पॅनल मध्ये सत्तासंघर्ष शिगेला पोहचला होता . यामध्ये आमदार मकरंद पाटील यांनी परिवर्तन पॅनलने सर्वच्या सर्व २१ जागा जिंकत सत्ताधारी संस्थापक पॅनलचा धुव्वा उडवला .
कारखान्याच्या निवडणूकीत दोन्ही पॅनलने प्रतिष्ठेची लढाई केली होती. तालुक्याचा स्वाभीमान जागा करीत प्रचाराचा धुरळा उडविला गेला होता. त्यामुळे मतदानाची टक्केवारीही वाढली होती . कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणूक झाल्याने मतदारांचा अंदाज कोणालाच नव्हता त्यामुळे प्रत्यक्ष गाठीभेटींवर भर देण्यात आला होता .
You must be logged in to post a comment.