मराठ्यांची राजधानी शिवमय…

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने राजधानी साताऱ्यातील माहोल शिवमय झाला. शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक तालुका व गावांमध्ये शिवाजी महाराजांवरील पोवाड्यांचा निनाद सुरु होता.

सज्जनगड, प्रतापगड, वसंतगड, अजिंक्यतारा, रोहिरेश्वर या किल्ल्यांवरुन शिवज्योत नेण्याची लगबग सुरु होती.
सज्जनगड, प्रतापगड, वसंतगड, अजिंक्यतारा, रोहिरेश्वर या किल्ल्यांवरुन शिवज्योत नेण्याची लगबग सुरु होती.शिवजयंतीच्या निमित्ताने सातारा शहरात पालिकेतर्फे पूर्ण तयारी करण्यात आली.

शिवजयंतीच्या निमित्ताने सातारा शहरात पालिकेतर्फे पूर्ण तयारी करण्यात आली. येथील पोवईनाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात सुशोभिकरण करण्यात आले होते.
सातारा शहरातील कमानी हौद परिसराला विजेच्या माळांनी प्रकाशित करण्यात आले. या ठिकाणी कारंज्या सुरु झाल्याने परिसरात वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले होते.
शहरात गल्लोगल्ली शिवमूर्तींचे पूजन करण्यात आले. ज्याप्रमाणे गणेशमूर्ती बसवतात, त्याच पध्दतीने चौकाचौकामध्ये शिवप्रतिमा ठेवून सभोवती सजावट करण्यात आली होती.
शिवजयंतीच्या निमित्ताने माजी नगराध्यक्ष शिवजीराजे भोसले यांच्या कन्या वृषालीराजे भोसले यांच्या हस्ते पोवईनाका येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शनिवारी सकाळी अभिषेक घालण्यात आला. यावेळी विविध ठिकाणांवरुन आलेल्या शिवभक्तांनी शिवस्तुस्त्रोत पठण केले.

error: Content is protected !!