‘कोयना दौलत’वरील भेटीत निवडणुकीत सहकार्याची ग्वाही

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांना निवडणुकीत सहकार्य करण्याची ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. ‘‘उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या प्रचाराच्या शुभारंभाला पुण्यात उपस्थित होते. आम्हीही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत,’’ असे देसाई यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या डॉ. जाधव यांनी रविवारी सकाळी देसाई यांच्या पोवई नाका येथील ‘कोयना दौलत’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. देसाई यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आणि विविध विषयांवर अनौपचारिक चर्चा झाली. देसाई यांनी सहकार्याची भूमिका स्पष्ट करत डॉ. जाधव यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी दैनिक ‘पुढारी’चे विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण, निवासी संपादक हरीश पाटणे, जाहिरात व्यवस्थापक मिलिंद भेडसगावकर, स्व. बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, दीपक पाटील, चंद्रशेखर घोरपडे आदी उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.