जवानाच्या खुनाप्रकरणी पत्नी, मेहुणा व भावजयला अटक

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सैदापूर, ता. सातारा येथील जवानाच्या खूनाप्रकरणी सातारा स्थानिक गुन्हे शाखेने पत्नी, मेहुणा व भावजय यांना अटक केली आहे. जवान संदीप पवार हे सुट्टीवर आल्यानंतर कुटुंबीयांना दारू पिवून मारहाण, शिवीगाळ करत त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून कुटुंबीयांनी दि. 27 रोजी लाकडी काठीने गंभीर मारहाण केली. ही घटना समोर येऊ नये, यासाठी कुटुंबीयांनी साताऱ्यात त्यांना उपचारासाठी न नेता थेट पुणे येथे हलवले. श्वविच्छेदनामध्ये ही बाब समोर आल्यानंतर अखेर सातारा एलसीबीने कौशल्यपूर्ण तपास करत संबंधित तिन्ही संशयितांना अटक केली.

सैदापूर, ता.सातारा येथे सुट्टीवर आलेल्या जवानाला गंभीर मारहाण झाल्यानंतर उपचार सुरू असताना पुणे येथील कमांड हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वानवडी, पुणे येथे खूनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर झिरोने गुन्हा सातारा तालुका पोलिस ठाण्यात येताच स्थानिक गुन्हे अन्वेषशण विभागाच्या पथकाने (एलसीबी) छडा लावला. याप्रकरणी सोमनाथ भरत आंबवले (वय 29, रा.खोलवडी ता.वाई), चेतना संदीप पवार (वय 35, रा.सैदापूर ता.सातारा), सुषमा राहूल पवार (वय 38, रा. यादोगोपाळ पेठ) यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर म्हणजे केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.

error: Content is protected !!