जिल्हाधिकरी कार्यालयात गाढवं घुसवण्याचा प्रयत्न


वडार समाजाच्यावतीने आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात गाढवे घुसवण्याचा प्रयत्न केला.

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : वडार समाजास जिल्हा प्रशासनाच्यावतीने खाणकामास परवानगी द्यावी. तसेच वाळू वाहतूकीस मंजूरी द्यावी, आदी मागण्यांसाठी वडार समाजाच्यावतीने गाढवांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, प्रशासनास आपल्या प्रश्नाची तीव्रता समजवी, यासाठी वडार समाजाने मोर्चासाठी आणलेली गाढवे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सोडली. त्यामुळे पोलीस प्रशासनाची धावपळ झाली. दरम्यान, या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

याबाबत माहिती अशी की, दगड खामकाम करणे हा वडार समाजाचा पिढीजात व्यवसाय आहे. परंतु सरकारने खाणकाम करण्यास मनाई केली आहे. अनेक खाणी बंद झाल्याने वडार समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच वाळू वाहतुकीसह बंदी घातल्याने वडार समाजातील लोकांसमोर बेरोजगारी प्रश्न निर्माण झाला आहे. समाजाच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वडार समाजाच्यावतीने गाढवांसह मोर्चा काढला. वेळी गाढवे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सोडली. तसेच ती जिल्हाधिकारी कार्यालयात घुसविण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे पोलीस प्रशासन आणि आंदोलन कर्तांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. समाजाच्यावतीने दिपक नलवडे, संदीप विटकर, संदीप पिसाळ, किरण निंबाळकर, उषा निंबाळकर आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

error: Content is protected !!