गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बोरगाव पोलिसांचे पथसंचलन

शिस्त, सलोखा आणि कायदा-सुव्यवस्थेचा दिला संदेश

बोरगाव,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद या दोन महत्त्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सातारा तालुक्यातील बोरगाव पोलिस स्टेशनतर्फे मार्गदर्शक पथसंचलन काढण्यात आले. या उपक्रमामुळे गावोगाव सुरक्षिततेचा संदेश पोहोचला असून नागरिकांमध्ये शिस्त, जबाबदारी आणि परस्पर सहकार्याची जाणीव निर्माण झाली आहे.

या पथसंचलनात २ पोलिस अधिकारी, २ शिपाई अधिकारी, २० पोलिस अंमलदार, रायटर, प्लाटून, १६ पोलिस अंमलदार आणि २० होमगार्ड सहभागी झाले. पथसंचलनादरम्यान नागरिकांना शांतता व कायदा सुव्यवस्था याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गावोगाव मोफत ड्रिल घेऊन आपत्कालीन परिस्थितीत कसे वागावे याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

हे पथसंचलन जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर, पोलिस उपअधीक्षक राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. यावेळी बोरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर, उपनिरीक्षक किशोर पानसरे, सुधीर भोसले, दीपक कारळे आदी अधिकारी उपस्थित होते.

“गणेशोत्सव हा आपल्या श्रद्धा आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. हा उत्सव शांततेत, शिस्तबद्ध पद्धतीने आणि कायदा-सुव्यवस्थेच्या चौकटीत पार पडणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांनी परस्पर सहकार्य करून सलोखा जपला, तरच गणरायाचा आशीर्वाद खऱ्या अर्थाने मिळेल. पोलिस प्रशासन आपल्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहे; मात्र गणेशोत्सव मंडळांनी, नागरिकांनीही जबाबदारीची जाण ठेवून कायद्याचे पालन करणे हीच खरी गणेशभक्ती आहे.”

  • धोंडीराम वाळवेकर, सपोनि. बोरगाव
error: Content is protected !!