कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने चिंता वाढली

जिल्ह्यात दिवसभरात 32 कोरोनाबाधित ; सात जण कोरोनामुक्त

 सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : गेल्या दहा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाने कहर केला असून नागरिकांच्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दररोज कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने कडक उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, रविवारी दिवसभरात जिल्ह्यात 32 कोरोनाबाधितांची वाढ झाल्याने कोरोनाबाधितांची संख्या 1336 वर पोहोचली  आहे. 

शनिवारी रात्री उशीरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 43, प्रवास करुन आलेले 5, असे एकूण 48 नागरिकांचा अहवाल कोरोनाबाधित आले असून यामध्ये 1 ते 75 वर्षे वयोगटातील 25 पुरुष व 23 महिलांचा समावेश असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. यामध्ये माण तालुक्यातील खडकी येथील 44 वर्षीय पुरुष, इंजबाब येथील 28 वर्षीय पुरुष, पळशी येथील 33 वर्षीय पुरुष,  मोगराळे 34 वर्षीय पुरुष, दानवलेवाडी येथील 30 वर्षीय पुरुष, वावरहिरे येथील 35 वर्षीय पुरुष, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 21 वर्षीय पुरुष, 22 व 25 वर्षीय महिला, लोणंद येथील 31 वर्षीय पुरुष, कोरेगाव तालुक्यातील सुरली येथील 56 वर्षीय पुरुष, साप येथील 41 वर्षीय महिला, पाटण तालुक्यातील कोयनानगर येथील 25,36,47 वर्षीय पुरुष व 50,40,23 वर्षीय महिला, काळकूटवाडी येथील 60 वर्षीय पुरुष, जावळी तालुक्यातील बिरामणेवाडी येथील 16 व 45 वर्षीय महिला, सायगाव येथील 60 वर्षीय महिला, सातारा तालुक्यातील जिहे येथील 20 वर्षीय युवक, शाहूनगर येथील 38 वर्षीय महिला, राधिका रोड येथील 50 वर्षीय पुरुष, खावली येथील 60 वर्षीय महिला, सदर बझार, कपिला पार्क येथील 40 वर्षीय महिला, मोळाचा ओढा येथील 25 वर्षीय पुरुष, बोरगाव येथील 13 वर्षीय युवती, 25 वर्षीय महिला व 1 वर्षाची बालिका, लिंब येथील 39 वर्षीय महिला. चोरगेवाडी येथील 30,16,48,36,24,20,40 वर्षीय पुरुष व 23, 45,75,35 वर्षीय महिला, वाई तालुक्यातील अभेपूरी येथील 45 वर्षीय पुरुष, कराड तालुक्यातील वाठार येथील 19 वर्षीय युवती, कैलास अर्पाटमेंट सैदापूर येथील 30 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ कराड येथील 46 वर्षीय पुरुष, बनवडी येथील 48 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. 

आणखी 32 पॉझिटिव्ह
रविवारी रात्री पुणे येथून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्या  आणखी 32 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1336 वर पोहोचली आहे. 

7 नागरिकांना डिस्चार्ज  
जिल्ह्यातील विविध  कोरोना केअर सेंटर  मधील उपचार घेवून बरे झालेल्या 7 रुग्णांना दहा दिवसानंतर रुग्णालयातून रविवारी डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती डॉ.आमोद गडीकर यांनी दिली. यामध्ये पाटण तालुक्यातील चाफळ येथील 27 वर्षीय पुरुष, खटाव तालुक्यातील मायणी येथील 27 वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील पाटखळ माथा येथील 28 वर्षीय पुरुष व राजापुरी येथील 39 वर्षीय पुरुष, खंडाळा तालुक्यातील सवली येथील 27 वर्षीय् पुरुष, शिंदे वस्ती (लोणंद) येथील 37 वर्षीय् महिला, वाई तालुक्यातील वाई शहरातील एका पुरुषाचा समावेश आहे.

126 नागरिकांचे नमुने तपासणीसाठी रवाना
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा यथील 63, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील 13, पानमळेवाडी येथील 10, मायणी येथील 14, महाबळेश्वर येथील 9, खावली येथील 17 असे एकूण 126 नागरिकांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस.पुणे येथे तपासणीला पाठविण्यात आले आहेत.



error: Content is protected !!