ना. शिवेंद्रसिंहराजे; आगामी हंगामासाठी बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ उत्साहात

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : शेंद्रे येथील माळरानावर स्व. भाऊसाहेब महाराजांनी लावलेल्या सहकाररूपी रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. अजिंक्यतारा कारखाना सातारा तालुक्यासह आसपासच्या तालुक्यातील हजारो शेतकरी आणि कामगार, ऊस तोडणी मजूर यांचे सुखाचे संसार चालवत आहे. कारखाना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण आणि सक्षम झाला असून तालुक्यातील एक मोठी संस्था बनला आहे. कारखान्यामुळे कार्यक्षेत्रातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम झाल्याने स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार झाले आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
शेंद्रे ता. सातारा येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा आगामी गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ उत्साहात झाला. याप्रसंगी ना. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे, व्हा. चेअरमन नामदेव सावंत, सर्व संचालक, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
ना. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, अजिंक्यतारा कारखान्याने सभासद शेतकऱ्यांची विश्वासाहर्ता मिळवली आहे. उच्चतम दर देण्याबरोबरच गाळपास येणाऱ्या उसाला वेळेवर पेमेंट देणारा कारखाना असा कारखान्याचा नावलौकिक आहे. कारखान्याच्या प्रगतीमध्ये कामगार, कर्मचारी यांचा सिंहाचा वाटा आहे. अडचणीचा काळ असताना अत्यंत नेटके, काटेकोर, नियोजनपूर्ण कामकाज करून कारखान्याने प्रगतीचा आलेख कायम चढता ठेवला आहे. ही संस्था सभासद शेतकऱ्यांची संस्था आहे. आपल्या हक्काची संस्था अशीच प्रगतीपथावर ठेवून सभासद, ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी आपण सर्वांनी नेहमीप्रमाणे सहकार्य केले पाहिजे.
हा काळ स्पर्धेचा आहे. आपला सर्वच्या सर्व ऊस आपल्याच अजिंक्यतारा कारखान्याला पुरवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपली संस्था मोठी झाली पाहिजे आणि त्यातून शेतकऱ्यांना अधिक चांगला दर देता आला पाहिजे, यासाठी कारखाना व्यवस्थापन नियोजनबद्ध काम करीत आहे. यासाठी आपले नेहमीप्रमाणे सहकार्य अपेक्षित आहे. त्यामुळे कोणीही इकडेतिकडे ऊस न पाठवता अजिंक्यतारा कारखान्यालाच ऊस द्यावा आणि हा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी याप्रसंगी केले.
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी सभापती सतीश चव्हाण, श्रीमती वनिता गोरे, पंचायत समितीच्या माजी सभापती सरिता इंदलकर, राहुल शिंदे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन सुनील काटे, जिल्हा सहकार बोर्डाचे धंनजय शेडगे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुरेश सावंत, कांचन साळुंखे, वाहतूक संस्थेचे चंद्रकांत घोरपडे, अजिंक्यतारा सूत गिरणीचे चेअरमन उत्तमराव नावडकर, उपाध्यक्ष अजित साळुंखे, सुरेश टिळेकर, गणपत मोहिते, गणपत शिंदे, विक्रम पवार, मधुकर पवार, धनाजी जाधव, आनंदराव कणसे, विजय पोतेकर, पद्मसिंह फडतरे, ज्ञानेश्वर गायकवाड, युनियन अध्यक्ष दिलीप शेडगे, राज्य संघटना चिटणीस सयाजी कदम यांच्यासह सर्व आजी माजी पदाधिकारी, आजी माजी संचालक, कार्यकर्ते, सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You must be logged in to post a comment.