एसपींना निवेदन; गुन्हा दाखल करण्याची पत्रकार संघटनांची मागणी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पत्रकारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून धमकी दिल्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात साताऱ्यातील पत्रकारांनी शुक्रवारी तीव्र निषेध व्यक्त केला. सातारा जिल्हा पत्रकार संघ, सातारा पत्रकार संघ आणि डिजिटल मीडिया परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांना निवेदन देऊन खासदार पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
शासनाच्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष तथा सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे आणि मार्गदर्शक विनोद कुलकर्णी यांच्या सूचनेनुसार हे निवेदन देण्यात आले.
यावेळी सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे यांनी पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांना घटनेची माहिती दिली. खासदार संजय दिना पाटील यांनी २५ जून रोजी पत्रकारांबाबत अपशब्द वापरत थेट धमकी दिली. संबंधित प्रकाराचे व्हिडिओ रेकॉर्ड उपलब्ध असून, पत्रकारांविषयी करण्यात आलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे, डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष सनी शिंदे, शहराध्यक्ष प्रतीक भद्रे, पत्रकार संघाचे पदाधिकारी ज्ञानेश्वर भोईटे, उमेश बांबरे, अमित वाघमारे, अजित जगताप, प्रवीण शिंगटे, विनीत जवळकर, संदीप राक्षे, रिझवान सय्यद, जावेद खान, प्रमोद इंगळे, संजय शिंदे, गौरी आवळे, मीना शिंदे, अभिजीत माने, सचिन सापते, पलाश जवळकर, आर. डी. भोसले, मंगेश कुंभार, स्वप्नील गवाळे यांच्यासह जिल्ह्यातील पत्रकार आणि छायाचित्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.