श्रीगणेश याग, जन्मकाळ सोहळा आणि महाप्रसादाचे आयोजन

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : येथील राजहंस गणेश उत्सव मंडळाच्यावतीने केसरकर पेठेतील मयूरेश्वर गणेश मंदिर, येथे गणेश जयंतीनिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, दि. १ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या सोहळ्याची सुरूवात सकाळी ६.३० वाजता श्रीगणेश यागाने होणार आहे. त्यानंतर सकाळी १० ते १२ या वेळेत गणेश जन्मकाळ सोहळा पार पडेल. या विशेष सोहळ्यानंतर दुपारी १२ वाजता महाआरती होणार आहे.
संध्याकाळी ७ ते १० या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, सर्व गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन राजहंस गणेश मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

You must be logged in to post a comment.